पहाटेचा निर्णय चुकीचा होता, राष्ट्रवादीसोबतचे जायला नको होतं – फडणवीस

मुंबई : राज्यातील 2019 ची विधानसभा निवडणूक म्हटली तर सगळ्यात आधी आठवतो तर तो म्हणजे पहाटेचा शपथविधी. या शपथविधीविषयी अनेकजण आपआपले कवायस लावत असतात.  हा निर्णय बरोबर होता का नाही, याविषयी सर्वजण आपआपला मत मांडतात. या शपथविधी विषयी आणि अजित पवारां (Ajit Pawar)सोबत जाण्याविषयी पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री आणि आता विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी आपलं मत मांडले आहे. या शपथविधीवर तब्बल दीड वर्षांनी देवेंद्र फडणवीस  यांनी मोठे विधान केले आहे.

मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घेतलेली शपथ ही एक चूकच होती, पण त्यांचा पश्चाताप नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे शपथ घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय हा चुकीचा होता. पण त्याचा आता पश्चाताप होत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी ज्यावेळी पाठीत खंजीर खुपसला जातो. तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावे लागते आणि तुम्ही राजकारणात मेलात तर तुम्हाला उत्तर देणे शक्य नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

2019 ला भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा भल्या पहाटे  पार पडला. त्यानंतर राज्यातल्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. पण पाठिंब्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार अवघ्या 80 तासांतच गडगडले. राष्ट्रवादीसोबतचे सरकार करायला नको होते. ती चूक आहे. असे सरकार आम्ही स्थापन करायला नको होते, असेही फडणवीस म्हणाले. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आम्हाला उत्तर द्यायचे असल्याचेही फडणवीस म्हणाले.

त्यावेळी मनात खूप राग आणि भावना होत्या. त्यामुळे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ते चुकीचे होते. आमच्या काही समर्थकांनाही ते आवडले नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या शपथविधीमुळे आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेली. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं, असं फडणवीस यावेळी म्हणाले. 80 दिवसांचे सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: