मुख्यमंत्री सहायता निधीला मिळाले, ५४१ कोटी मात्र खर्च झाले
ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -१९ या खात्यात आर्थिक मदत करण्याचे अवाहन केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या खात्यात भ-भरून रक्कम जमा केली होती.
मुख्यमंत्री सहायता निधी खात्यात तब्बल ५४१ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ १३२ कोटी रुपये खर्च झाले आहेत अशी माहिती आता समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या संदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती.
मुख्यमंत्री साहाय्यात निधीला मदत देणाऱ्यांची नावे द्यावीत, अशी मागणीही कोलारकर यांनी केली होती. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं कारण देत देणगीदारांची नावे देण्यास नकार देण्यात आला आहे.
शिवाय, सरकारकडून मिळालेल्या माहितीमध्ये देणगीदारांची नावे नाहीत. केवळ धनादेशाचे क्रमांक आहेत. त्यावरून नावे शोधून काढणे खूपच जिकिरीचे काम आहे,’ असं मिलिंद कापडी यांनी स्पष्ट केलं आहे