मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला ; अतिवृष्टी पॅकेज मधील 2297 कोटी निधीच वितरण

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला ; अतिवृष्टी पॅकेज मधील 2297 कोटी निधीच वितरण

नागपूर – परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळेल असे चार दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार म्हंटले होते. त्यानुसार मदतीचा पहिला हप्ता जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याची माहिती नागपूर येथे पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा होईल, असा शब्द राज्य सरकारने दिला होता. त्यानुसार २ हजार २९७ कोटी ६ लाख रुपयांची मदत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. उर्वरित मदत ही दिवाळी नंतर दिली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मदतीची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागाला ५६६ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. विदर्भाला केवळ ८ कोटी रूपायांची मदत देणार आहे ही अफवा कोणत्या नेत्याने पसरवली हे माहीत नाही.

८ कोटी रुपयांची ही अफवा सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना मदत द्या, मदत द्या म्हणून ओरडतात. मात्र, केंद्राकडून काही मदत मिळावी, यासाठी स्वतःहून मात्र काही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: