लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत देवेंद्र फडणवीस यांच्या उपिस्थतीत भाजपात प्रवेश केला. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाविकास आघडीच्या अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लावून जोरदार टीका केली होती. त्यातच लाजखोर अधिकारी ज्योती देवरे प्रकरणात आमदार निलेश लंके यांच्यावर चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. आता वाघ यांच्या टीकेला लंके यांनी उत्तर दिले आहे.

“अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली. महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा”, असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

Team Global News Marathi: