ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा, सत्ताधारी आणि विरोधकांनी दिली सहमती

 

ठाणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जमीन हस्तांतरण प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून रखडलेला होता. अखेर आज ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजप यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाच्या प्रस्ताव आज ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.

यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता. मात्र तब्बल तीन वेळा सभा तहकूब करण्यात आली होती. तसंच एक वेळा हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला होता. पण अखेर बुलेट ट्रेनसाठीच्या जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. या महत्वाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रस्तावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सहमती झाल्याचे चित्र सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा झाल्यापासून हा प्रकल्प वादात सापडला आहे. या प्रकल्पातील १२ स्टेशन्सपैकी ८ स्टेशन्स गुजरातेत असल्यानं या प्रकल्प गुजरातच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं.

बुलेट ट्रेनच्या कामामुळे रोजगार संधी उपलब्ध होई. बुलेट ट्रेनच्या कामामुळे त्या मार्गावरील गृहनिर्माण उद्योगाला बळ मिळेल. बुलेट ट्रेनच्या मार्गावर लॉजिस्टिक्स हब तयार होतील. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतील अशी चारही मनपा बैठकीत सुद्धा झालेली पाहायला मिळाली होती.

Team Global News Marathi: