ठाकरे गटाला आणखी खिंडार पडणार ? उदय सामंतांच्या विधानाने नव्या चर्चेला सुरवात

 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भरती पूजनात पक्षासोबत सत्ता स्थापन केली. यानंतरही शिंदे गटाकडून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम सुरूच आहे. मुख्यमंत्री शिंदे आज आपल्या आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. गुवाहाटीला जाण्यापूर्वी शिंदे गटाचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ निर्माण झाली.

आम्ही गुवाहटीवरून परत येताना जास्त आमदार घेऊन येऊ,” असे सूचक वक्तव्य उदय सामंत केले आहे. त्यामुळे शिंदे गट या दौऱ्यात ठाकरे गटाला आणखी काही धक्का देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिंदे गट गुवाहाटीवरुन परत आल्यानंतर ठाकरे गटाला आणखी खिंडार पडले की नाही, हे लवकरच समजेल.

गुवाहाटीला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार मध्यमांशी संवाद साधला. राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना कामाख्यादेवीकडे करणार आहोत. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत, आम्ही राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे,अशी प्रार्थना देवीला करणार असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच गुवाहाटीवरून गेल्यावेळी आम्ही गडबडीत आलो होतो. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आता श्रद्धेने जात आहोत. आमचे सर्व आमदार उत्साहात आहेत, असेही म्हणाले.

Team Global News Marathi: