ठाकरे सरकार हे हिंदूद्वेष्ट सरकार, दहीहंडी बंदीवरून मनसेची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा सर्व सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. आगामी काळात दहीहंडी उत्सवाला मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून भाजपाबरोवर आता माणसे सुद्धा आक्रमक पाहायला मिळत आहे.

दहीहंडी साजरी करायला मान्यता द्यायचीच नव्हती तर मग मिटींग घेतली कशाला. आम्हाला आमचं म्हणणं नीट मांडूही दिलं नाही. हे सरकार हिंदूद्वेष्ट सरकार आहे, ज्यांना दहीहंडी साजरी करायची आहे त्यांनी ती करावी मनसे त्यांच्यासोबत आहे असं म्हणत बाळा नांदगावकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच दहीहंडी आयोजकांच्या मागे खंबीर उभी राहणार असल्याचे सुद्धा नांदगावकर यांनी बोलून दाखविले आहे.

सण हा प्रत्येक धर्मातल्या लोकांनी साजरा करायलाच हवा. पिढ्यानपिढ्या हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. कोरोनाच्या आणि दुसऱ्या-तिसऱ्या लाटेच्या नावाखाली किती निर्बंध आमच्यावर घालणार आहात आणि आम्ही का सहना करायचं हे? मध्यंतरी मोहरम झाला त्याला परवानगी देण्यात आली, आमचं काहीही म्हणणं नाही पण सरकारने आमच्या धर्माचाही सन्मान राखला पाहीजे, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: