ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ नेत्यांच्या यादीत दोन नाव विसरले ‘यशवंत जाधव आणि किशोरी पेडणेकर’

 

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल ट्विट करत महाविकास आघाडी सरकार मधील 12 नेत्यांची यादी जाहीर केली. या यादीतील नेत्यांचा किरीट सोमय्या यांनी “डर्टी डझन” असा उल्लेख केला आहे. तसेच या नेत्यांवर किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यापूर्वी यातील अनेक नेत्यांचे घोटाळे सोमय्या यांनी बाहेर काढले होते.

आता याच डर्टी डझन घोटाळेबाज 12 नेत्यांची यादी घेऊन आता किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या दिल्लीत अधिकाऱ्यांची घेणार भेट घेणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं की, “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी किरीट सोमय्या आता आरोपांचा कुठला नवा बॉम्ब फोडतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अनिल परब संजय राऊत सुजीत पाटकर भावना गवळी आनंद अडसूळ अजित पवार हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक रवींद्र वायकर जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख नवाब मलिक “डर्टी डझन”च्या यादीत आणखी दोन नेत्यांची नावे किरीट सोमय्या यांनी काहीवेळापूर्वी जाहीर केली आहेत.

सोमय्या यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलं की, ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ नेत्यांच्या यादीत आणखी दोन नेत्यांची नावे मी विसरलो. ही नावे आहेत यशवंत जाधव, यामिनी जाधव कुटुंबीय आणि महापौर किशोरी पेडणेकर असे ट्विट करून त्यांनी माहिती दिली होती.

 

Team Global News Marathi: