राज्य सरकार मधील दहा मंत्री अन 20 आमदारांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र सरकारमधील दिग्गज मंत्र्यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे.राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

यशोमती ठाकूर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करीत नववर्षाचे स्वागत, सण, उत्सव, लग्न समारंभ आदी कार्यक्रम साधेपणाने व कमीत-कमी नागरिकांच्या उपस्थितीत साजरे करावे, असे त्या यावेळी म्हणाल्या.तसेच मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटाईजरचा वापर तसेच सामाजिक अंतर राखणे या कोविड त्रिसूत्रीचे पालन सर्वांनी करावे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पण त्याचवेळी अनेक राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नकार्य (wedding ceremony) थाटामाटात झाली. त्यामध्ये झालेल्या गर्दीत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील १० मंत्री (ministers), २० आमदार (mla) कोरोना बाधित (infected coronavirus) झाल्याने खळबळ उडाली आहे.

राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांचे शाहीविवाह सोहळे

राजकीय नेत्यांच्या मुलांच्या शाही विवाह सोहळा रंगला. यात मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत,माजी खासदार प्रफुल्ल पटेल,  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, उदयसिंह रजपूत, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा समावेश होता. यातील बहुतांश लग्नांना राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहिले.

महाविकास आघाडीतील मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  2 दिवासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांचीही कोरोना चाचणी केली असता दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. विरोधी पक्षातील म्हणजेच भाजपमधील राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना झाला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून कोणत्याही क्षणी राज्यात लॉक डाऊन जाहीर केले जाण्याची दाट शक्यता आहे.

बातमी शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: