‘तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे’

 

अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात या फोटोच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्यात आले आहे.

या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार -सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळतायत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी काही फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत . राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Team Global News Marathi: