‘कर’ भला, हो भला! माझ्या संस्थेतील प्रत्येक रुपया गरजूंसाठी !

 

मुंबई | अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला असल्याचा आरोप करत आयकर विभागाने सोनू सूदची चौकशी केली होती. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी देणगी नियमन कायद्याचे उल्लंघन केले आहे, असेही आयकर विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता सोनू सुधाने यावर ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

सोनू सूदने आज सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून आपले निवेदन जारी केले. ‘कर’ भला, हो भला… असे म्हणत सोनूने आपल्या संस्थेतील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे, हे स्पष्ट केले. तसेच काळ सर्व गोष्टींचा उलगडा करेल असेही त्याने म्हटले आहे.

‘प्रत्येक देशवासीयाचा आशीर्वाद पाठीशी असतो तेव्हा खडतर मार्गावरील प्रवासही सोपा वाटू लागतो,’ अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली. पुढे निवेदनात सोनूने म्हटलंय, ‘आपल्याला स्वतःची बाजू मांडण्याची गरज नसते. काळ सर्व सांगतो. मी माझ्यापरीने आणि मनापासून प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या फाऊंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे.

Team Global News Marathi: