टाटा एअरबस प्रकल्पासाठी काय केले? आघाडीने खुलासा करावा

 

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातमध्ये गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून आताच्या सरकारवर टीका करणे म्हणजे आपण महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधक शिंदे सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे भाजपचे नेते आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. याच मुद्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशात प्रकल्प राबवला गेला.

विमान निर्मितीच्या या प्रकल्पासाठी ८ सप्टेंबर २०२१ रोजी एअरबस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच २४ सप्टेंबर २०२१ रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. एअरबस आणि टाटा यांच्यातील करारानुसार संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्याचे रतन टाटा यांनी त्याच दिवशी जाहीर केले होते, असा दावाच नितेश राणे यांनी केला.

Team Global News Marathi: