… तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांची घणाघाती टीका

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाला सलाम करत होते, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी शनिवारी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माणमंत्री असताना किती मराठी विकासक त्यांच्या कार्यालयात येत होते? अमराठी विकासकांची रांग का होती? उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत किती मराठी कंत्राटदारांना काम दिले, असा सवालही त्यांनी केला.

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या कष्टाने घामाने, हौतात्म्याने, मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही पदावर बसून मराठी माणूस, संस्कृती, भाषा याचा विपर्यास होईल, अशी स्थिती आणू नये, असे आमचे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आव्हाड आणि मराठी माणसाच्या हिताचा संबंध काय? गृहनिर्माणमंत्री असताना त्यांच्या दालनात अमराठी विकासकांची रांग का होती?, माफीचा उद्योग करायचा असेल तर बऱ्याच माफी मागाव्या लागतील, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना कोणत्या विकासकाला थंड हवेचे ठिकाण विकसित करायला दिले होते?, मुंबई महापालिकेत २५ वर्षांत एकाही मराठी कंत्राटदाराला येऊ दिले नाही, याचे उत्तर सेनेने द्यावे.

कोल्हापुरी चप्पल आणि जोडे मारो आंदोलनाची एवढीच खुमखुमी असेल, तर सावरकरांचा अपमान केल्यावर मणीशंकर यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांनी केला. काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत आल्यावर काँग्रेसने जी अभद्र भाषा वापरली, त्यानंतर तुमच्या हातात ते जोडे का नाही आले, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

“बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही”

“संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार”

Team Global News Marathi: