.तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही” अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाची नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय ऑपरेशन केले होते. ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळल्याने राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याने त्यांना नगरपालिका घोषित करण्यात आले. या निर्णयाचा बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

या निर्णयानंतर आता अजित पवारांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. पुढील ५० वर्षांचा विचार न करता असा निर्णय घ्यायला लागले तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही असे त यावेळी म्हणाले आहेत.फुरसुंगी, उरुळी देवाची गावातील गोडाऊनचा टॅक्स वाढतो किंवा कुणाच्या फायद्यासाठी तात्पुरता विचार करून लोकभावना विचारात न घेता कोणाच्यातरी सांगण्यावरून नगरपालिका जाहीर करून टाकल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हडपसर येथील अमरसृष्टी हौसिंग सोसायटीच्यावतीने उभारलेल्या ४० किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॉवर जनरेशन प्लांटचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चेतन तुपे, हेमलता मगर, सुनील गायकवाड, नीलेश मगर, प्रशांत जगताप, योगेश ससाणे, डॉ. शंतनु जगदाळे, सोसायटीचे चेअरमन स्वप्नील धर्मे यावेळी उपस्थित होते.

Team Global News Marathi: