…तर मी पुन्हा ‘हर हर महादेव’वर भाष्य करणार नाही; संभाजीराजे आक्रमक

 

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप शिवप्रेमी संघटनांकडून करण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट टीव्हीवर दाखवू नये अशी भूमिका देखील काही संघटनांकडून घेण्यात आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हर हर महादेव चित्रपटाबाबत आपण अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवण्यास आपला विरोध असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत मी चुकीची भूमिका घेतो असं मला कोणी सांगावं, त्यानंतर मी पुन्हा या चित्रपटावर भाष्य करणार नाही असंही यावेळी संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं संभाजीराजे यांनी? संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवण्यास विरोध आहे.

जो इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जातो तोच इतिहास नवी पिढी खरी मानणार. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ऐतिहासिक चित्रपटाचे पाहिले स्क्रिनिंग महाराष्ट्रात व्हावे आणि त्यासाठी एक समिती निर्माण व्हावी अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज यांनी केली आहे. ‘चुकीचा इतिहास दाखवू नका’ दरम्यान संभाजीराजे यांनी चित्रपटातील विविध दृष्यांवर आक्षेप घेतला आहे.

Team Global News Marathi: