.तर मग हिदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल; नितेश राणेंचा इशारा

 

प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. पवार याने काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी हिंदूंवरील हल्ल्याच्या घटनेमध्ये वाद झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

अशातच आता राजेंद्र पवारावरील हल्ल्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. कर्जतमधील पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असून आम्ही गप्प बसणार नाही. हिंदूंवर हल्ले होत असतील तर मग हिंदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.

आ. नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती कर्जतमध्ये घडली आहे. या ठिकाणी हिंदू समाजातील प्रतीक पवार या युवकावर हल्ला करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावरून लक्ष ठेऊन आहेत, असे राणे यांनी म्हंटले.

Team Global News Marathi: