“… तर कदाचित माजी CM ‘लाईव्ह’ दिसले असते, सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले. त्यानंतर, गडचिरोलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी करुन शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आढावा घेतल्याचं सांगितलं.

तसेच, प्रशासनालाही सूचना केल्या आहेत. शिंदे-फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यावरुन सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेनं घेतलेल्या गडचिरोली दौऱ्याकडे सदाभाऊ खोत यांनी लक्ष वेधले.

‘कर्तव्यदक्षता कुठे जागी असेल तर ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या ठायी तुम्हाला अनुभवायला मिळेल. आधीचे मुख्यमंत्री असते तर कदाचित आज आपल्याला लाईव्ह दिसले असते आणि म्हणाले असते. “माझं इथून लक्ष आहेच”… असे खोचक ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

“… तर कदाचित माजी CM ‘लाईव्ह’ दिसले असते, सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले. त्यानंतर, गडचिरोलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी करुन शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आढावा घेतल्याचं सांगितलं.

तसेच, प्रशासनालाही सूचना केल्या आहेत. शिंदे-फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यावरुन सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेनं घेतलेल्या गडचिरोली दौऱ्याकडे सदाभाऊ खोत यांनी लक्ष वेधले.

‘कर्तव्यदक्षता कुठे जागी असेल तर ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या ठायी तुम्हाला अनुभवायला मिळेल. आधीचे मुख्यमंत्री असते तर कदाचित आज आपल्याला लाईव्ह दिसले असते आणि म्हणाले असते. “माझं इथून लक्ष आहेच”… असे खोचक ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

Team Global News Marathi: