..तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी, सुप्रिया सुळेंनी केली मागणी

 

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना सक्तवसुली संचनालया अर्थात ईडीने दिलासा दिला आहे. जर ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांचे ईडी प्रकरण चर्चेत आले आहे.

MMRDA टॉप सिक्युरिटी घोटळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा EOW नंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने देखील आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आज पुण्यात कचरा प्रकरणी आंदोलन करत असताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. जर ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी. ईडीच्या क्लोजर रिपोर्टनुसार खरंच सरनाईक कुटुंबीय निर्दोष असेल तर भाजपने जाहीर माफी मागावी कारण या प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घेतली तर ही उघड उघड ब्लॅकमेलिंग होतं हे दिसतंय, अशी टीका सुळे यांनी केली.

Team Global News Marathi: