मोबाईलच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी हा उपाय करा

शालेय जीवनामध्ये कधी तुम्ही तंत्रज्ञान शाप की वरदान या विषयावर निबंध लिहिला असेल. त्यात आपण तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजूंचा विचार केला. म्हणजेच आपण तंत्रज्ञानाचे फायदे सांगताना त्याचे तोटेही सांगितले. कारण तंत्रज्ञान मानवासाठी साह्यभूत सिद्ध होत असले तरी त्याचे दुष्परिणामही माणसावर होत असतात. आता अगदी सर्वांच्याच हातात दिसणाऱ्या मोबाईलचेच उदारहण घ्या. मोबाइलचे अनेक फायदे असले तरी त्यातून निघणाऱ्या रेडिएशन फ्रिक्वेन्सीमुळे माणसाच्या शरीरावर त्याचे होणारे परिणामही तितकेच स्पष्ट झाले आहेत.

मोबाईलमधील या रेडिएशन फ्रिक्वेन्सीचा परिणाम लक्षात घेऊन त्यापासून आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी शक्यतो रात्री झोपताना मोबाइल लांब ठेवा किंवा पुढे सांगितलेला एक उपाय करा. तो उपायही मोबाईलमध्येच सुचविण्यात आलेला आहे.

तुम्ही अभिनेते अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा 2.0 हा चित्रपट पाहिला असेल. तर त्यात मोबाईलच्या रेडिएशन फ्रिक्वेन्सीमुळे होणाऱ्या परिणांमांचा गंभीर प्रश्न मांडण्यात आलेला आहे. माणसाप्रमाणेच प्राणी-पक्ष्यांवरही या फ्रिक्वेन्सीचा काय परिमाण होतो, हे या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. अर्थात हे या चित्रपटातच पहिल्यांदा सांगण्यात आले आहे असे नाही तर यापूर्वीही अनेक वेळा, वेगवेगळ्या माध्यमातून याविषयी सांगितले गेले आहे. तसेच अनेकदा महागडे मोबाईलही पेटल्याच्या किंवा त्यांच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यासाठी मोबाईलमधील रेडिएशन लेव्हल कारणीभूत ठरलेली दिसून येते.

रेडिओ फ्रिक्वेन्सीचे होतात हे दुष्परिणाम

सेलफोन, मोबाईल टॉवर, अँटेना, वायफायमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपले शरीर शोषून घेते. आपल्या शरीरात ६० टक्के विविध द्रवपदार्थ असतात. उदा. रक्त, पाणी आदी. तर, मेंदूमध्ये ७३ ते ७८ टक्के द्रवपदार्थ असतात. त्यामुळे रेडिएशन मेंदूमध्ये जास्त प्रमाणात शोषले जातात. त्यामुळे अनेक आजार होतात. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांचे शरीर रेडिएशन अधिक प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये, शरीरात जास्त आतपर्यंत रेडिएशन (किरणोत्सार) होते. त्यामुळे मेंदूच्या मध्य भागात ट्यूमरचा धोका वाढतो जो कानाच्या जवळ होणाऱ्या ट्यूमरपेक्षा जास्त घातक असतो. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये रक्तातील पेशींचे पुनरुत्पादन जास्त वेगात होते. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढण्याचा वेगही जास्त असण्याचा धोका असतो.

गर्भवती महिला आणि गर्भावरही रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे होणाऱ्या रेडिएशनचा परिणाम होतो. त्यासाठी गर्भवती महिला आणि लहान मुलांनी मोबाईलचा अतिशय कमी वापर करावा. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती कमजोर होते. त्यांचे अभ्यासात, कामात लक्ष लागत नाही. त्यांची शिकण्याविषयी आणि आकलनविषयक क्षमता कमी होते. तर पुरुषांमध्ये वीर्याची गुणवत्ता घसरते, वीर्यामधील शुक्राणूंच्या संख्येत घट होते आणि त्यांची हालचाल मंदावते. हे हानीकारक रिडेअएशन मोबाईल फोन चालू करून पँटच्या खिशात ठेवला तरी सुरूच असते. कारण मोबाईल फोनचे सिग्नल सतत सेल टॉवरशी संपर्क साधत असतात. या रेडिएशनमुळे त्वचेवरही दुष्परिणाम होतात. त्वचेस खाज सुटणे, वेदना होणे, सूज येणे आदी त्रास होतात. जगातील कोट्यवधी लोकांमध्ये श्रवणविषयक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी शक्यतो मोबाईलचा कमी वापर करण्याबरोबरच रात्री झोपताना मोबाईल लांब ठेवावा. पण तेही शक्य नसेल तर मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवून झोपण्यामुळेही या रेडिएशनपासून बचाव करता येतो. फ्लाइट मोडवर मोबाईल ठेवल्यामुळे मोबाईलची नेटवर्क सर्च फ्रिक्वेन्सी पूर्णपणे बंद होते.

आपल्या मोबाईलची रेडिएशन लेवल चेक करा

याशिवाय आणखीही एक उपाय आहे. तो म्हणजे आपल्या मोबाईलमधील फ्रिक्वेन्सी लेवल माहिती करून घेणे. त्यासाठी आपल्या मोबाईलवर *#07# डायल करा. आपल्या फोनची radiation level कळेल. जर ही लेवल 2.6watt/kg पेक्षा कमी असेल तर शरीरासाठी ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त असेल तर तो फोन बदलणे गरजेचे आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: