T20 मध्ये विराट कोहलीने केली रोहित शर्माच्या या विश्वविक्रमाची बरोबरी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या टी २० सामन्यात ५९ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ५० हून अधिक धावा काढण्याची विराटची २१ वी वेळ होती. या खेळीबरोबरच त्याने रोहित शर्माच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावाने होता. 

रोहितने १७ अर्धशतकं आणि ४ शतकांसह २१ वेळा ५० हून अधिक धावा बनवल्या आहेत. विराट कोहलीच्या नावाने सध्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाही शतकाची नोंद नाही.

न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने १६ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल आणि ब्रँडन मॅक्युलम १५-१५ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. विराटने ४५ चेंडूवर ५९ धावांची खेळी केली. ऋषभ पंतच्या सहाय्याने त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 

विंडीजने भारताला १४७ धावांचे आव्हान दिले होते. उत्तरादाखल भारताने २७ धावांवर भारताचे दोन्ही सलामीवीर गमावले होते. त्यानंतर विराट कोहली आणि पंतने १३३ धावांपर्यंत धावसंख्या पोहोचवत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. कोहलीने सुनील नरेनला चौकार मारुन टी २० मधील २१ वे अर्धशतक पूर्ण केले. कोहली थॉमसच्या चेंडूवर पॉईंटवर झेल देऊन बाद झाला.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: