स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधव देवसरकरवर पदाधिकाऱ्याच्या पत्नीकडून विनयभानगाचा आरोप !

 

कोरोनानंतर राज्यात पहिला मराठा मूक मोर्चा छत्रपती संभाजी राजेंच्या उपस्थितीत काढणारे आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधव देवसरकर यांच्यावर सहकाऱ्यांच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यांच्या सहकाऱ्यानंचं आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवून विनयभंग केल्याचा आरोप नांदेड येथे पत्रकार परिषदेत केला आहे या आरोपांमुळे एकाच खळबळ उडाली आहे.

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावानं कार्य करणारे आणि नांदेड येथील मराठा मोर्चाचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या माधुराव देवसरकर यांनी माझ्यासोबत असलेल्या संघटनात्मक संबंधाचा फायदा घेत माझ्यासोबत असभ्य आणि अश्लील वर्तन केले. तसेच तिचा विनयभंग केला असल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्याच्या पत्नीनं केलाय. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सामाजिक कामाच्या निमित्तानं देवसरकर हे कुटुंबाशी निगडित होते. त्या गोष्टीचा फायदा घेत पदाधिकऱ्यांच्या पत्नीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, विकृत मानसिकता ठेऊन देवसरकर यांनी या पवित्र संबंधाचा गैरफायदा घेत सहकाऱ्याच्याच पत्नीवर वाईट नजर ठेवली. दरम्यान एका दिवशी रात्री उशिरा त्याच्या पत्नीच्या वैयक्तिक मोबाईलवर आपली फेसबुकची फ्रेंड रिक्वेस्ट का स्वीकारत नाही? असा मेसेज टाकला. तर एका दिवशी कार्यक्रम असल्याच्या बहाण्यानं ते घरी येऊन वाईट नजरेनं माझ्या पत्नीकडं डोळ्यानं इशारा केला आणि लगट करण्याचा प्रयत्न केला, असे आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आले आहेत.

Team Global News Marathi: