सुशांतसिहं प्रकरण, चार महिने झालं सीबीआयच्या काय हाती लागलं सांगा? – अनिल देशमुख

सुशांतसिहं प्रकरण, चार महिने झालं सीबीआयच्या काय हाती लागलं सांगा? – अनिल देशमुख

सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन चार महिने उलटले तर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यात अद्याप सीबीआयला यश मिळालेले नाही हाच मुद्धा पकडत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत केंद्रावर ताशोरे ओढले आहे.

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवून जवळपास ४ महिने झाले. मात्र CBI ने अजूनही सुशांतसिंगची आत्महत्या होती की हत्या याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. नागरिकांना या प्रकरणाबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे CBI ने या तपासाबाबत लवकरात लवकर खुलासा करावा,अशी मी विनंती करतो”, असे ट्विट देशमुख यांनी केले आहे.

सुशांतसिह राजपूत मृत्यूनंतर अनेक प्रकरणे समोर आली होती. यात बॉलीवूड घराणेशाही, एका तरुण मंत्र्यांचे नाव तसेच ड्रग्स प्रकरण समोर आले होते. तसेच बॉलीवूड मधील आघाडीच्या अभिनेत्रीची चौकशी सुद्धा ड्रग्स प्रकरणी करण्यात आली होती. तसेच घराणेशाहीच्या मुद्द्यावर स्टार किड्स आणि बॉलीवूड घराणेशाहीवर टीका करण्यात आली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: