सुशांत प्रकरणाचा तपास डॉ दाभोळकर तपास होऊ नये – शरद पवार

सुशांत प्रकरणाचा तपास डॉ दाभोळकर तपास होऊ नये – शरद पवार

सुशांत सिह राजपूत प्रकरणी काल सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाद्वारे यापुढे राजपुत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. या निकालानंतर विरोधी पक्षाने एकप्रकारे आनंदोत्सव साजरा केला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासकार्याप्रमाणे याची परिणीती होणार नाही, असे ट्विट करत शरद पवार यांनी व्यक्त केली. आज तागायत मुंबई पोलिसांनी केलेल्या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल मुंबई पोलिसांना दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल
असा विश्वास शरद पवार यांनी ट्विटरवरुन व्यक्त केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: