सुषमा अंधारे यांचे पती करणार शिंदे गटात प्रवेश, शिंदेंचा मोठा डाव

 

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सुषमा अंधारे यांना झटका देत शिंदे गटात वाघमारे यांना मोठे पदही दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदे गटाने ही मोठी खेळी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अंधारे बॅकफूटवर जातात की अधिक आक्रमक होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे हे ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे. मात्र, शिंदे गटात सय्यद यांच्या प्रवेशाला भाजपच्या महिला आघाडीने विरोध केल्याचे वृत्त आहे सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले.

सुषमा अंधारे यांनी अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात त्यांची छाप सोडली. त्या शिंदे गटावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट हल्लाबोल केला. त्यामुळेच शिंदे गटाने वैजनाथ वाघमारे यांना शिंदे गटात आणण्याचा डाव आखला. शिंदे गटाच्या या राजकीय खेळीला सुषमा अंधारे काय उत्तर देतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Team Global News Marathi: