निमित्त सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचे: आता विचार करा तुमचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट सुरक्षित आहेत की नाही?

ग्लोबल न्यूज – अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असलेल्या विविध संस्थांच्या तपासणी दरम्यान व्हॉट्स अ‍ॅप चॅट्सचा मुद्दा समोर आला आहे. सुशांतच्या टॅलेन्ट कंपनीच्या मॅनेजरच्या चॅटच्या माध्यमातून ड्रगचा उल्लेख आला. त्यानुसार आता याप्रकरणी एनसीबी चौकशी करत आहे. पण यामुळे एक वेगळा प्रश्न समोर आला आहे. बॉलिवूड ड्रग अँगलच्या तपासणी दरम्यान नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जुन्या मेसेजेस मिळवण्यात कसे काय यशस्वी झाले?

या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्स अ‍ॅपकडून स्पष्टीकरण समोर आले आहे. गुरुवारी सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म व्हॉट्स अ‍ॅपने म्हटले आहे की, त्यांचे मेसेजेस सुरक्षित आहेत आणि कोणतीही थर्ड पार्टी हे मेसेजेस सहजरित्या मिळवू शकत नाही, म्हणजेच कोणत्याही थर्ड पार्टीला मेसेजमध्ये प्रवेश नाही.

व्हॉट्स अ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘व्हॉट्स अ‍ॅप तुमचे संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित करते. जेणेकरुन आपण आणि ज्याच्याशी आपण बोलत आहात… जे पाठविले गेले आहे तेच वाचू शकता. हे संदेश इतर कोणीही वाचू शकत नाहीत, व्हॉट्सअ‍ॅपवर देखील नाहीत. ते म्हणाले की, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की लोक फक्त एक फोन नंबर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर आपल्या संदेशांवर प्रवेश वापरुन व्हाट्स अ‍ॅपवर साइन अप करतात’.

ही लक्षणे देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना, दुर्लक्ष न करता, असा वाढवा ऑक्सिजन !

तसेच कंपनी नमूद करते की, ऑन-डिव्हाइस स्टोरेजसाठी व्हॉट्स अ‍ॅप ऑपरेटिंग सिस्टिम निर्मात्यांनी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करते आणि आम्ही ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे संकेतशब्द किंवा बायोमेट्रिक आयडीसारख्या सर्व सुरक्षा उपायांचा फायदा घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतो. जेणेकरुन कोणतीही थर्ड पार्टी आपल्या डिव्हाइसवरील स्टोअर सामग्रीमध्ये प्रवेश करु शकणार नाही.

या बाबत माहिती घेताना असे समोर आले की, अनेकांचा असा विश्वास आहे की, 2005 पासून मोबाईल फोन क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन संदेशांमध्ये अ‍ॅक्सेस मिळवला जात आहे. एक क्लोन केलेला फोन व्हॉट्स अ‍ॅप बॅक-अप चॅटमध्ये प्रवेश करु शकतो, जिथे एन्क्रिप्टेड नाही, जिथे जिथे संग्रहित केले असेल, अशा गुगल ड्राईव्ह किंवा क्लाऊडवर जाता येते.

धक्कादायक: ठाण्यात शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची सावत्र भावाकडून गोळ्या झाडून हत्या.

क्लोनिंग हे एक तंत्र आहे ज्याद्वारे संबंधित फोनची सेल्युलर ओळख आणि डेटा एका नवीन फोनमध्ये कॉपी केला जातो. आपल्याकडे संबंधित फोन नसतानाही सध्या हे अ‍ॅपद्वारे केले जाऊ शकते. या प्रक्रियेमुळे आंतरराष्ट्रीय मोबाइल स्थानक उपकरणे ओळख (आयएमईआय) नंबर देखील हस्तांतरित करता येतील.

जरी ते वैयक्तिक पद्धतीने म्हणजे एखाद्या व्यक्तींने वापरणे बेकायदेशीर आहे. पण कायदेशीर मार्गाने फोनमध्ये साठलेल्या डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी अधिका-यांना फॉरेन्सिक पद्धतीने जावे लागते. सुशांत सिंग प्रकरणात ड्रग्स अँगलची तपासणी करणा-या एनसीबीने व्हॉट्स अ‍ॅप चॅटच्या आधारे अनेक सेलिब्रेटींना समन्स पाठवले आहे. त्यानंतर देशभरात असे प्रश्न उपस्थित झाले होते की जर एनसीबी माहिती गोळा करु शकते याचा अर्थ व्हॉट्स अ‍ॅप चॅट्स सुरक्षित आहेत की नाहीत?

मोहोळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व एक पोलिस कर्मचारी निलंबीत

ग्लोबल न्युज नेटवर्क: