सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे कोरोनामुळे निधन

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे कोरोनामुळे निधन

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांचे चेन्नई येथे कोविडमुळे निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापासून त्यांच्यावर चेन्नईतील खाजगी रुग्णालयात कोविडवर उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असताना त्यांची तब्येत अधिक खालावली होती. अखेर आज त्यांची आजाराशी झुंज संपली. कोरोनाने आणखी एक कलावंताचा बळी घेतला.

मात्र कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी खास एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्यांनी आपल्याला काही त्रास होत नसल्याचे सांगितले. परंतु परिवाराच्या आग्रहाखातीर दाखल करण्यात आले असे व्हिडिओत सांगितले. मी लवकरच बरे होऊन येईन चिंता करू नका असा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी संदेश चाहत्यांना दिला होता. त्यात १४ सप्टेंबरला त्याची तब्येत सुधारत असल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली होती. मात्र अखेर कोरोनाच्या संसर्गाने त्यांना आपला जीव गमवावा लागला.

गायक सलमानचा आवाज म्हणून ओळखला जात असे

बाला सुब्रमण्यम यांना सलमान खानचा आवाज म्हणूनही ओळखले जात असे. त्याने सलमानची अनेक हिट गाणी गायली. गुरुवारी त्यांची प्रकृती गंभीर झाल्याच्या बातमीनंतर सलमान खानने त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. बाला सुब्रमण्यम सर, सलमानने ट्विट केले होते की, ‘मी लवकरच तुला बरे होण्यास मनापासून खूप शक्ती आणि आशीर्वाद देतो. तुम्ही माझ्यासाठी गायलेलं गाणं खास बनवल्याबद्दल धन्यवाद, तुझं हृदय वेड्यात हिरो प्रेम आहे, लव्ह यू सर.

ही लक्षणे देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना, दुर्लक्ष न करता, असा वाढवा ऑक्सिजन !

एसपी बालसुब्रमण्यम गाणी

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी आपल्या कारकीर्दीत 40000 पेक्षा जास्त गाणी गायली. त्यांनी तेलुगु, तामिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्येही गायली. 8 फेब्रुवारी 1981 रोजी एसपी बालसुब्रमण्यम यांनी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तासांत 21 कन्नड गाणी रेकॉर्ड केली. हे स्वतःच एक रेकॉर्ड आहे. एसपी बालसुब्रमण्यम यांनीही एका दिवसात 19 तामिळ गाणी आणि 16 हिंदी गाणी रेकॉर्ड केली.

म्हणून अन्नावर कधी राग काढू नये,जाणून घ्या काय सांगते शास्त्र,वाचा सविस्तर-

ग्लोबल न्युज नेटवर्क: