सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही – शरद पवार

सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही – शरद पवार

ग्लोबल न्यूज: विजय चोरमारे लिखित “कर्तृत्ववान मराठी स्त्रिया” या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले या प्रकाशन संभारंभाला भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार सुद्धा उपस्थित होते. यावेळी शेलार यांनी ‘मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी’, असे विधान शरद पवार यांच्या समोर केले होते. या विधानानंतर राज्यात अनेक तर्क-वितर्क चर्चेला सुरवात झाली होती.

यावर आता खुद्द शरद पवार यांनी भाष्य केले आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडतं. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे, असं पवारांनी सांगितले आहे एका दैनिक वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी भाष्य केले आहे. मात्र, शेलार यांच्या या विधानावर भाजपमधून नाराजी व्यक्त झाल्यावर त्यांनी लगेच सारवासारव केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: