सुप्रीम कोर्ट हे कुणाच्या खिश्यात राहू शकत नाही’, संजय राऊतांनी शिंद-फडणवीस सरकारला फटकारले

 

महाराष्ट्रमध्ये बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, लादले गेले आहे. विधिमंडळाचा वापर केला गेला, राजभवनाचा वापर झाला आहे महाराष्ट्रमध्ये बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, लादले गेले आहे. विधिमंडळाचा वापर केला गेला, राजभवनाचा वापर झाला आहे. सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्या खिश्यात राहू शकत नाही.या देशाची न्याय व्यवस्था ही कुणाची गुलाम राहू शकत नाही’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाच्या भवितव्याचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.या निर्णयाच्या आधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘महाराष्ट्रमध्ये बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, लादले गेले आहे. विधिमंडळाचा वापर केला गेला, राजभवनाचा वापर झाला आहे. 11 कोटी जनतेच्या वतीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत.

आम्हाला विश्वास आहे की या देशामध्ये लोकशाही आहे की नाही, या देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो की, याच्यावरही दाब दबाव आणि दडपशाही आहे. याचा निकाल आज कोर्टामध्ये लागणार आहे. याचा काय निर्णय आहे, तो कोर्ट घेईल’असं राऊत म्हणाले. ‘आम्ही सर्वोच्च न्यायालय हे आमच्या खिश्यात आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल अशी वक्तव्य समोरच्या बाजूने केली जात आहे.त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली नाही. सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्या खिश्यात राहू शकत नाही. या देशाची न्याय व्यवस्था ही कुणाची गुलाम राहू शकत नाही. म्हणून आम्ही अत्यंत अपेक्षेनं कोर्टाकडे पाहत आहोत’ असं परखड मतही राऊतांनी मांडलं.

Team Global News Marathi: