‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड’ – देवेंद्र फडणवीस

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले की, षडयंत्र रचून १२ आमदारांचे निलंबन केले होते तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा जो अवैध ठराव केला होता तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. आता हे १२ आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत आपलं कर्तव्य बजावण्याकरता पात्र ठरवले आहेत.

हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की, हे बाराही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरोधात आवाज उठवत होते. अशावेळी सभागृहात न घडलेल्या घटनेकरता आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करुन त्याच्या आधारे म्हणजेच एकप्रकारे षडयंत्र रचून या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

Team Global News Marathi: