सुपरमॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा, मात्र भाजपच्या परवानगीची गरज

 

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करुन जर त्यातूनवाईन तयार होत असेल. त्या वाईनला चांगलं मार्केट मिळून शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर तो चांगला निर्णय असल्याचे मत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं. सुपरमॉल्समध्ये वाईन विकण्याच्या प्रस्तावाबाबत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना माझं अनुमोदन असल्याचेही सत्तार म्हणाले.


शंभूराज देसाई यांनी जर असा प्रस्ताव आणला तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मला कृषीमंत्री म्हणून वाटत आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांच्या परवानगिशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना भाजपने या निर्णयला विरोध केला होता. याबाबत देखील सत्तार यांना प्रश्न विचारण्यात आला.

सत्तार म्हणाले की, याबाबचा विभाग शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. ते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील. शेवटी भाजपच्या नेत्यांच्या परवानगिशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. पण शंभूराज देसाई यांची भाजपच्या नेत्यांसोबत याबाबत काही औपचारीक चर्चा झाली असेल असं मला वाटत असल्याचे सत्तार यावेळी म्हणाले. चर्चा जर झाली नसेल तर भाजपच्या नेत्यांसोबच शंभूराज देसाई चर्चा करतील.

Team Global News Marathi: