ऐन दिवाळीत दक्षिणायन किरणोत्सवात अंबाबाईला सूर्यस्नान ;पहा अंबाबाईचे विलोभनीय रूप

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवार (दि. ८)पासून किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला होता. पहिल्या दिवशी प्रखर किरणांनी चरणांना स्पर्श करत पायापर्यंत पोहोचली. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही किरणे मूर्तीच्या कंबर पोहोचली. चौथ्या दिवशी किरणोत्सवाच्या मालिकेनुसार किरणे मूर्तीच्या मुखावर पडतात अशी परंपरा आहे. यंदाच्या वर्षी कायम राहिली.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारच्या माव‌‌ळतीला अंबाबाईच्या मूर्तीस सूर्यस्नान झाले. सोनसळी किरणांनी सायंकाळी पाच वाजून ४७ व्या मिनिटांनी देवीच्या मुखावर येत तिला अभिषेक घातला. दक्षिणायन किरणोत्सव दोन दिवस उशिरा होत असल्याने आज, शुक्रवारीदेखील पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होण्याची शक्यता आहे.करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाचा गुरुवारी पाचवा दिवस होता.

हा अखेरचा दिवस असल्याने या दिवशी तरी सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत जाऊन किरणोत्सव पूर्ण होईल, अशी अपेक्षा सार्थ ठरली. सायंकाळी पाच वाजता महाद्वार कमानीतून आलेल्या किरणांनी प्रवासाचा एक-एक टप्पा पार करीत पाच वाजून ४४ व्या मिनिटांनी देवीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर पुढे सरकत-सरकत पाच वाजून ४७ व्या मिनिटांनी किरणे चेहऱ्यावर आली.

सुवर्णालंकारभूषित श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाई. आजच्या किरणोत्सव सोहळ्यामध्ये सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणांच्या अभिषेकामध्ये न्हाऊन निघाली. दीपावलीच्या पूर्वसंध्येला देवीचे हे रूप विलोभनीय असे होते.

 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांच्या मंदिरामध्ये यावर्षीचा नवरात्रोत्सव देखील साधेपणाने पार पडला. याकाळात, सर्व धार्मिक विधि व पूजा मंदिर व्यवस्थापनांनी खंड न पडू देता पूर्ण केल्या. आता, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव पार पडत आहे. वास्तुकलेच अप्रतिम नमुना म्हणून कोल्हापूरातील महालक्ष्मीच्या मंदिराला अनोखं महत्व देखील आहे.

किरणोत्सव हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचा अनोखा सोहळा . सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर स्पर्श करतात. साधारण दिडशे मीटर हून अधिक अंतर कापून ही किरणे महाद्वार कमानीतून येणारी ही किरणं गरुड मंडप गणेश मंडप मध्य मंडप अंतराल मंडप गर्भागार अशा रस्त्याने देवीच्या भेटीला येतात.

तेव्हा मंदिरातले सर्व विद्युत दिवे बंद केले जातात या सोनेरी किरणांच्या प्रकाशात जगदंबेचं दुर्गा सप्तशती च्या प्राधानिक रहस्यात दिलेलंर तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची हे वर्णन सार्थ ठरते. या किरणांचा स्पर्श होताच मोठा घंटानाद करून सहावी आरती केली जाते. गेली कित्येक शतके अव्याहत सुरू असलेला सुंदर व अलौकिक उत्सव!

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: