उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये”; आशिष शेलारांचा राऊतांना टोला

मुंबई – पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.तसेच राऊत यांच्या मागणीवरून त्यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.

संजय राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आता भाजपाने राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

“उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये” असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. “ज्यावेळी एखादा पक्ष बलवान होतो. तेव्हा बाकिच्यांना स्पेस कमी होते. भारतीय जनता पक्षाने कुठलाही पक्ष संपवणे, फोडणे, उखाडणे असं म्हटलेलं नाही. उखाड देंगे म्हणणारे आता जेलमध्ये गेलेत. संपवण्याची भूमिका बोलणारे कोण? त्यांची वाताहत झालीय़. भाजपाने हे सर्व सहन केलं. असा विचारही कधी भाजपाने केला नाही. इंडिया म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे इंडिया हे बोलणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: