राज ठाकरे यांच्या मागणीला यश, राज्य सरकार घेणार जिम सुरु करण्याचा निर्णय
महाविकास आघाडीने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच जिम सुरु करण्याबाबत निर्णय देण्यात येईल अशी घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. सर्व अटी-शर्ती आणि नियमांचे पालन करून जिम सुरु करण्यासाठी येत्या दोन दिवसात परवनगी देण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री विजय वड्डेटीवार यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या मागणीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राज ठाकरेंची मागणीसुद्धा रास्त आहे. ती मागणी योग्य होती. मागणी कोणीही केली तरी सरकार सर्व बाजूंचा विचार करुन निर्णय घेत असतं. फडणवीस, राज ठाकरे यांनी मागणी केली असली तर सरकारने सर्व विचार करुनच निर्णय घेतला आहे. दोन दिवसात यासंबंधी आदेश निघेल असे त्यांनी बोलून दाखविले.