सत्तेत नव्हे, सेवेत राहायचं आहे, मोदींच देशातील नागरिकांशी ‘मन की बात’

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी आजच्या मन की बातमधून विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, वृदांवन धामची भव्यता, पर्यावरण आदी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेल्या राजेश कुमार प्रजापती नावाच्या व्यक्तीशी मोदींनी संवाद साधला. त्याचं आजारपण, त्याला मिळालेली मदत आदी मुद्द्यांवर मोदींनी प्रजापतीशी संवाद साधला.

तसेच इतरांनाही या योजनेची माहिती देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी प्रजापती यांना केलं होत. त्यावेळी प्रजापती यांनी मोदींच्या दीर्घायुष्याची कामना केली. तुम्ही सत्तेत रहोत अशी भावनाही त्याने व्यक्त केली. त्यावेळी मी आता सत्तेत असल्याचं मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ नये, अशी माझी भावना आहे. मी सत्तेऐवजी सेवेला महत्त्व देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ऑस्ट्रेलियात पर्थ नावाचं शहर आहे. या शहराबद्दल आपल्या क्रिकेटपटूंना आणि क्रिकेटप्रेमींना अधिक माहिती असेल. कारण या ठिकाणी नेहमी क्रिकेटचे सामने होतात. पर्थमध्ये सेक्रेड इंडियन गॅलरी आहे. ती ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगतारिणी यांच्या मालकीची आहे. त्या जगतारिणी यांनी वृंदावन येथे येऊन १३ वर्ष वास्तव्य केलं. वृदांवनशी त्यांचं नातं जुळलं होतं. जगतारिणी यांनी ऑस्ट्रेलियात वृदांवन निर्माण केलं, असं त्यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: