“राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला होणारा विरोध हा हिंदूंच्या शौर्याला विरोध आहे” – संजय राऊत

 

हिंदूंनो, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला होणारा विरोध हा हिंदूंच्या शौर्याला विरोध आहे, हे लक्षात घ्या ! – संपादकछत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी मोगलांच्या विरोधात प्रखर लढा देऊन धर्मांधांना सळो कि पळो करून सोडले होते. हा इतिहास दडपण्यासाठी विरोध करणारे खासदार इम्तियाज जलील हे राष्ट्रद्रोहीच आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी जलील यांच्यावर केली आहे.

शिवसेना आणि भाजप यांनी या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली असतांना दुसरीकडे MIM खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध दर्शवला आहे. याविषयी पत्रकारांशी बोलतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराणा प्रताप यांना ‘एम्.आय.एम्.’चा विरोध कशासाठी ? महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे शौर्य, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद यांचे प्रतीक आहेत.

मोगल आणि आक्रमणकर्ते यांच्या विरोधात त्यांची तलवार चालली. त्यांनी हिंदूंचे रक्षण केले. हिंदु महिलांना संरक्षण दिले. मंदिरांचे रक्षण केले; म्हणून जर कुणी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करत असेल, तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवा, अशी चेतावणी त्यांनी एम्.आय.एम्.ला दिली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी याच पैशांमधून ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी यांसाठी सैनिकी शाळा चालू केली जावी, अशी मागणी केली आहे. सैनिकी शाळांविषयी एवढा कळवळा आहे, तर इम्तियाज जलील यांनी स्वतःच्या खासदार निधीतून सैनिकी शाळांसाठी निधी द्यावा. महाराणा प्रताप यांच्याविषयी बोलून इम्तियाज जलील वातावरण खराब करत आहेत असा टोला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: