वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर छत्रपती संभाजी राजेंचे वक्तव्य
वंचित बहुजन आघडीचे सर्वेसर्वा, माजी खासदार प्रकार आंबेडकर यांनी काळ प्रसार माध्यमांशी चर्चा करताना साताऱ्याचे राजे खासदार उदयनराजे भोसले तसेच खासदारा छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका ऐकली होती. या टीकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका होताना दिसून येत होती. तर आघडी सरकारचे मंत्री संभूराजे देसाई यांनी सुद्धा यावर आक्षेप घेत प्रकाश आंबडेकर यांच्यावर टीका केली होती.
आता प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेसंदर्भात खासदार छत्रपती संभाजी राजेंना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. “वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत.
एक राजा बिनडोक, तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही राजांवर निशाणा
शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे संबंध होते. प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर वक्तव्य करणे, मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करायला नको होते. माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे. असे राजेंनी बोलून दाखविले.