राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

 

मुंबई | मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत असून मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत होणारी वाढ पाहता आता राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, काल महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या ११४९२ इतकी होती आणि आज ही संख्या २९ हजारावर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत १३०० सक्रिय रुग्ण आहेत आज संध्याकाळी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रुग्ण दुपटचीचं प्रमाण वाढत आहे. सक्रिय रुक्णांची संक्या दररोज ही ४०० ते ५०० होती पण आता ही संख्या २००० च्या पुढे आज असण्याची शक्यता आहे. मुंबईत दररोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहेत. सध्या २२०० केसेस सापडत आहेत त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ४ वर आहे.हा पॉझिटिव्हिटी रेट नक्कीच चांगला नाहीये. यामुळे आपल्याला कााळजी घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध लावण्यात आले आहेत. मॉल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध लावण्यात आले आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

मुख्यमंत्री घेणार निर्णय आपल्या येथे जर निर्बंधांचे पालन केले नाही आणि सहजासहजी सर्व गोष्टी घेतल्या तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्याया करावेच लागेल. निर्बंध लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे घेईल. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल आणि कदाचित थोड्या प्रमाणात निर्बंध लावण्यावर निर्णय होऊ शकेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Team Global News Marathi: