राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद

सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. आज मुंबईत तसेच राज्यात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे.

राज्यात करोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, राज्य सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना तातडीने निर्णय घेऊन पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे, विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्येही करोनानं डोकं वर काढलं आहे.

तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकारकडून काही निर्बंध आणले जाण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज काही महत्त्वाची घोषणा करणार का? याकडेही सगळ्याचं लक्ष असणार आहे.

Team Global News Marathi: