राज्य सरकारकडून मोहित कंबोज यांच्या अटकेची तयारी सुरु? नव्या ट्विटमुळे खळबळ

राज्य सरकारकडून मोहित कंबोज यांच्या अटकेची तयारी सुरु? नव्या ट्विटमुळे खळबळ

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर भाजप आणि संबंधित लोकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनीही काही गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान क्रूज ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Panday) यांनी गुन्हा दाखल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेचं भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी स्वागत केलं आहे. तसंच या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Govt) तीन कॅबिनेट मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करत याची चौकशी व्हावी अशी मागणीही कंबोज यांनी केली. त्यानंतर आता त्यांनी आपल्याला अटक करण्याची तयारी सुरु असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मला अटक होणार आहे असं दिसतंय! जय भवानी जय शिवाजी ! गुन्हा निश्चित नसतो, मात्र गुन्हेगार निश्चित असतो. आघाडी सरकारचा अंधार! असं म्हणत त्यांनी दोन नवे ट्विट केले आहेत. त्यामुळे आता त्यांना अटक होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंबोज यांनी आातपर्यंत अनेकदा नवाब मलिक, संजय राऊत आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत.

 

मोहीत कंबोज यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, मुंबई पोलीस आयुक्तांकडून आर्यन खान केसची थांबवलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे, त्यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो.

क्रूझ केसशी संबंधीत एनसीबीचे अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून याच्या चौकशीसाठी जी एसआयटी बनवली होती. ही एसआयटी आता बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. त्याची पुन्हा चौकशी करण्याची गरज असल्याचं नव्या पोलीस आयुक्तांनी म्हटलंय, याचं मी स्वागत करतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: