“राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आलाय; आजच्या सामना अग्रलेखातून घणाघाती टीका !

 

शनिवारी एका कार्यक्रमात आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना संदर्भात वादग्रस्त विधी करून नवा वाद अंगावर ओढवून घेतला होता. वेळ पडली तर सेनाभवन पण फोडू असे विधान त्यांनी केले होते त्यांच्या या विधावरून शिवसेनेने संताप व्यक्त केला होता तसेच खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आमचे शाखा प्रमुख उत्तर देतील असे विधान करून लाड यांची खिल्ली उडवली होती. आता भाजपच्या लाड यांच्या विधानावर आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आलेली आहे.

सामनात लिहिले आहे की, भाजपाची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून महाराष्ट्रात भाजपाचा अंतकाळ जवळ आला आहे हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत. ‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली.

सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. जी शिवसेना घरभेद्यांच्या निषेधाच्या आरोळय़ांनी गडबडली नाही, दिलेल्या शब्दास न जागणाऱ्या भाजपच्या फसवेगिरीने नाउमेद झाली नाही. उलट आज ती महाराष्ट्राची सत्ताधारी झाली असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

Team Global News Marathi: