छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र चालू करा – युवासेनेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र चालू करा – युवासेना

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे महान कार्य केले आहे, ते कार्य जनसामान्य आणि तरुण पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. आपले विद्यापीठ असे एकमेव विद्यापीठ आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. या विद्यापिठाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात परसले आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा अभ्यास माहिती होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास, केंद्र चालू करावे, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन प्रभारी कुलगुरु नितीन करमळकर यांना देण्यात आले. या वेळी रजिस्टार नांदिवडेकर उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यात अडचणी असल्याने पूर्व सत्रातील गुणांच्या आधारावर पदवीच्या कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचा निकाल शिवाजी विद्यापीठाने लावला. या पद्धतीने गुणांक मिळाल्याने सहस्रो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने घोषित झालेला निकाल रहित करावा, तसेच विद्यार्थ्यांना सहामाई २ आणि ४ मध्ये उत्तीर्ण दाखवावे. असे न केल्यास मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात येईल. या वेळी पूनम पाटील, सुदेश आयरेकर, प्रसाद जामदार, अथर्व बापट यांसह अन्य युवासैनिक उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: