राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 August 2022
शनिवार. 
27.08.2022
शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
आज विशेष -साधारण दिवस. 
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 20.26 पर्यंत नंतर पूर्वाफाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
_________________________


आजचे राशीभविष्य – Today’s Horoscope 27 August 2022

मेष – (शुभ रंग- पिस्ता)
तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचे हितशत्रू तुमच्या चुका शोधत आहेत सतर्क रहा.

वृषभ – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावाच लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत होऊ शकतो.

कर्क- ( शुभ रंग- पांढरा)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अतिशय स्पष्ट बोलून काही जवळची नाती दुखावू नका.

सिंह – (शुभ रंग – हिरवा )
भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. घरात काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील.

कन्या – ( शुभ रंग- भगवा)
आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. पासपोर्ट विजा विषयक कामे गती घेतील.

तुळ – ( शुभ रंग- नारिंगी)
नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. व्यवसायात सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. जितके कमी बोलाल तितके चांगले राहील.

धनु – ( शुभ रंग – मोरपंखी)
वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. आज कुठेही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.

मकर – ( शुभ रंग- आकाशी)
व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.

कुंभ – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)
आजच स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये मतभेद संभवतात. सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी करा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन 9689165424
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: