” एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजपचा हात”

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहे मात्र या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये त्यातच या आंदोलनात आता विरोधात सुद्धा उतरले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरु झालेली आहे, याच मुद्दयावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घणाघाती टीका भाजपवर केली आहे.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर बोलतानाही नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजप आहे आणि हे आता उघड झालं आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण भाजपकडून गढूळ केलं जात असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी यावेळी केली होती.

तसेच यावेळी पटोले यांनी अमरावती येथे घडलेली हिंसाचाराची घटना आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संपावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी नाना पटोले रविवारी अंबरनाथ येथे होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अंबरनाथ नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा इशारा दिला आणि सोबतच भाजपवर देखील हल्लाबोल केला.

आम्ही जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं आणि महाराष्ट्र शांत झाला. पण अमरावती येथे जो काही प्रकार घडला त्यात भाजपचे माजी मंत्री आणि 25-26 कार्यकर्ते वाद निर्माण करताना सापडले असल्याचं नाना पटोले म्हणाले. तर भाजप राज्यात हिंदु-मुस्लिम वाद निर्माण करत आहे आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

Team Global News Marathi: