एसटी खासगीकरणाचा विचार नाही तो एक पर्याय आहे-अनिल परब

 

मुंबई  | राज्य परिहवन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना एसटीचं खासगीकरण करण्याच्या संदर्भातील वृत्त समोर आलं. एसटी महामंडळाचं खरंच खासगीकरण होणार का? असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता. यावर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार नाहीये मात्र, तेो एक पर्याय आहे असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे. एसटी महामडंळाचं राज्य शासनात विलिगीकरण कऱण्यात यावं अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

या विलिगीकरणाच्या निर्णयावर समितीच निर्णय घेईल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं, चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना एसटी कर्मचारी युनियनचे ऐकतायत ना भाजप नेत्यांचे. आंदोलन नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतोय. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जातोय.

तसेच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनदा बोललो. पण नंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. त्यापेक्षा चर्चा करा. निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे. फडणवीस यांनी प्रवाशी कराचा फॉर्म्यूला सांगितला,जो आम्ही गांभीर्याने घेतला आहे. कोरोनापूर्व काळात हा फॉर्म्यूला शक्य होता. आता खूप मोठा गॅप पडलाय. आताही तो करता येईल.

त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल असंही अनिल परब म्हणाले. वेगवेगळ्या पर्यायांचा विचार एसटी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसं सरकारचं धोरण आहे त्याच प्रमाणे नागरिकांच्या बाबतीतही… त्यांना पर्यायी व्यवस्था करुन देणं सरकारचं काम आहे. त्यामुळे जर कामगार आपल्या मागणीवर अडून बसले तर सरकारला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केलाच पाहिजे आणि त्याबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे परिहवन मंत्री अनिल परब यांनी काल दिली होती.

Team Global News Marathi: