एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाबाबत महत्वपूर्ण माहिती

 

मुंबई | : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर मागच्या अनेक महिन्यापासून कर्मचारी आंदोलन करत सून अद्याप या आंदोलनाला यश आलेले नाहीये अशातच आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते काल न्यायालयात गैरहजर राहिल्याने आज पुन्हा सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांची संप सुरुच आहे.

एसटी महामंडळाने काल न्यायालयात अवमान याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली असता मुख्य न्यायमूर्तींनी यावर कर्मचारी संघटनेच मत किंवा युक्तीवाद जाणून घ्यायचा असल्याने घाई करू नका, असे निर्देश महामंडळाला दिलेत. तर राज्य सरकारकडून अहवाल स्वीकारला आहे. मात्र विलीनीकरण शक्यच नसल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीच्यावेळी काय निर्णय येतो, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये घेण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम राहणार की कामावर परतणार असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडला आहे.

Team Global News Marathi: