सोशल मिडीयाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंची बदनामी, एकविरोधात तक्रार दाखल

 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह व राष्ट्रवादी पक्षाची सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा खडसे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्यात आली होती.

आमदार एकनाथराव खडसे यांची व पक्षाची आणि परीवाराची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शिवमुद्रा या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरत मृत्युंजय नामक व्यक्तीने नाथाभाऊंवर अगदी गलिच्छ व खोटे आरोप करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांनी दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात पोलिस प्रशासनाला निवेदन देवून दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाच पोलीस छडा लावत असून या प्रकरणी सायबर पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: