इतका बिनकामाचा आणि अक्कल शून्य मुख्यमंत्री पहिल्यांदा पहिला – निलेश राणे

इतका बिनकामाचा आणि अक्कल शून्य मुख्यमंत्री पहिल्यांदा पहिला – निलेश राणे

पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव च्या माध्यमातून आवाहन केले होते. ते समाजमाध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना केले.


महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. दिवाळीनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही, दुसरी तिसरी लाट येऊ शकते. कृपा करून सगळं सुरू केलं म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादावर भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘कालचं मुख्यमंत्र्याचे फेसबुक लाईव्ह इतके फालतू होते की आता लोकचं शिव्या घालतायत. महाराष्ट्राच्या एकही प्रमुख विषयाला हात घातला नाही पण नुसती तीच सडलेली बडबड. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की इतका बिनकामाचा आणि अक्कलशून्य मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाला.’ अशी जळजळीत टीका राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: