विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला सोनू सूद, दहा हजार किमतीचे १०० मोबाईलचे केले वाटप

विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला सोनू सूद, दहा हजार किमतीचे १०० मोबाईलचे केले वाटप

कोरोनाच्या काळात मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी सिनेअभिनेता सोनू सूद देवदूतासारखा धावून आला होता. या सर्व परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था सोनू सूदने स्व:खर्चाने केली होती. आता पुन्हा एकदा सोनू सूद शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या शाळा बंद असून ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिक्षण दिले जात आहे. पण अनेक मुलांकडे लॅपटॉप, संगणक, स्मार्टफोन नसल्याने त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अशा मुलांना योग्यप्रकारे शिक्षण घेता यावे यासाठी सोनूने १०० विद्यार्थ्यांना स्मार्टफोन वाटले आहे. कोपरगाव येथील आढाव माध्यमिक विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांना सोनू सूदने प्रत्येकी दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल वाटप केले आहे.

सोनू सूदचा एक मित्र कोपरगाव येथे राहातो. त्याचा मित्र विनोद राक्षेला विद्यार्थ्यांची ही अडचण माहीत होती. त्यानेच याविषयी सोनूला सांगितले आणि सोनू लगेचच या मुलांना मदत करण्यासाठी तयार झाला. तो शिर्डीला दर्शनासाठी गेला होता. तिथून थेट त्याने कोपरगाव गाठले आणि स्वतःच्या हाताने मोबाईलचे वाटप केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: