“ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना शिवाजी महाराजांच्या गुरुपदी लादले”

ब्राह्मण मुठीतून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर काढावे लागतील; श्रीपाल सबनीस यांचं विधान

ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी. असे विधान श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. राजकारणात भ्रष्टाचार आहे, पण त्याहीपेक्षा महाराजांना जातीत बांधू पाहणाऱ्या या विद्वानांची विद्वत्ता भ्रष्ट झाली आहे.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आणि विवेकवादी भूमिका या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी ते नागपुरात आले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

नेमके काय म्हणाले श्रीपाल सबनीस?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुंवरून जो वाद मध्यंतरी निर्माण झाला, त्यामध्ये जातीचे संदर्भ आहेत. ब्राह्मण समाजातल्या काही विद्ववानांचा आवडता गैरसमज आहे की ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो. शिवाजी महाराजाच्या कर्तृत्वामुळे त्या श्रेष्ठतेच्या संकल्पनेला तडा गेला.

यामुळेच रामदास स्वामी यांचे नसलेले गुरूपण, दादोजी कोंडदेव यांचे नसलेले गुरूपण हे शिवाजी महाराजांच्या डोक्यावर स्थापित करण्यात आले. हे ब्राह्मणी विद्वानांचे कारस्थान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे ब्राह्मणेत्तर विद्वानांनी ब्राह्मण महाराजांचे शत्रु असल्याचा भास निर्माण करताना कृष्णाशी कुळकर्णी यांना महाराजांनी ठार केल्याचे उदाहरण दिले आहे. यावेळी बोलताना मात्र पण कृष्णाजी कुळकर्णी यांनाही स्वराज्याचे शत्रू म्हणून महाराजांनी मारले हे ब्राह्मणेत्तर विद्वानांना ठाऊक नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

“महाराज हे हिंदुत्त्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे. या जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून महाराजांची सुटका व्हावी,” असे सबनीस म्हणाले. महाराजांच्या नावावर सुरू असलेल्या धार्मिक, राजकीय दुकानदारींवर त्यांनी प्रहार केले.

बाबासाहेब पुरंदरे यांचा इतिहासाचा अभ्यास मला आदरणीय आहे. त्यांनी शिवाजी महाराज घरादारात पोहचवले, हेही मला मान्य आहे, पण त्यांच्या इतिहासातील शिवाजी ब्राह्मणांकडे झुकलेला आहे. तर ब्राह्मणेत्तर शरद पाटलांनी देखील शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग केला, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी म्हटले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: