सोमय्यांच्या ‘डर्टी डझन’ यादीवर अजित पवार यांचे सूचक विधान

 

रोहा : राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून किरीट सोमय्या यांनीच नेलं मंत्र्यांवर घोटाळे केल्याचा आरोप केला होता अशातच त्यांनी 12 घोटाळेबाज नेत्यांची नावे जाहीर केली होती या डझन’ची यादी आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आदी सर्व मुद्द्यांवर स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्यांनी जाहीर केलेल्या यादीत अजित पवार यांचं नाव घेण्यात आलं होतं. त्यावर काळ आणि वेळच त्या सर्व गोष्टी दाखवून देईल, अशी सूचक प्रतिक्रिया देत थेट सोमय्यांना इशारा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आले होते. डॉ. सी. डी. देशमुख सभागृहाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, पालक मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते. सध्याची राजकीय परिस्थिती, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेले आरोप-प्रत्यारोप, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावर बोलताना त्यांनी

Team Global News Marathi: